Fri, Apr 26, 2019 15:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › Live Updates : पावसाचे मुंबईला झोडपणे सुरुच; सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी (Video)

Live Updates : पावसाचे मुंबईला झोडपणे सुरुच; सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी (Video)

Published On: Jul 09 2018 7:52AM | Last Updated: Jul 09 2018 12:56PMठाणे : प्रतिनिधी

मुंबईत पावासाचा जोर वाढला असून रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक संथगतीने सुरु असून अनेक रेल्वे १५ मिनिटे ते एक तास उशिराने धावत आहेत. पावासाचा वाढता जोर आणि वाहतूक व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. याची घोषण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.

पावचसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने वसई पुर्वेकडील मीठानगर येथे ४०० लोक अडकले आहेत. पालघर आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी विवेकानंद कदम आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार वसई पालिका मदत पथक आणि महसूल विभागाचे कर्मचारी नवघर मिठाघर येथे पोहणार आहेत.तेथील काम करणाऱ्या कामगारांना होड्यांद्वारे काढण्यात येत आहे. मिठाघर परिसरात नेहमीच पाणी साचते आणि तेथील कामगारांना प्रशासन काळजी घेण्याच्या सूचना देत असते. केवळ वसईचा हा ग्रामीण भागच नाही तर शहरी भागातही पाणी साचले आहे. त्यामुळे होड्या चालवून प्रशासन मदत कार्य करीत आहे, पण अडकलेल्या कामगारांना काढण्यात येत असल्याचे तहसिलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.

दरम्यान, मध्य रेल्वे मार्गावरील सेंडहस्टरोड स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाजूची सुरक्षा भिंत रेल्वे रुळावर पडल्याने डाऊन मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. तात्काळ रेल्वे कमगारांनी काम करून त्या पडलेल्या भिंतीचा भाग रुळावरून हटवून वीस मिनिटात कल्याण लोकल तिथून रवाना झाली आहे. लोकल सेवा अजूनही सुरू असून सुमारे एक तास उशिरा धावत आहेत.

शनिवार, रविवार सुट्टीची धमाल झाल्यानंतर सोमवारी कामावर जाण्याचा पहिला वार असल्याने पहाटे पासून रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. काही प्रवासी लोकल मधून उतरून पुढील स्थानाकापर्यंत पायी चालत जात आहेत. पावसाचा जोर वाढला तर लोकल ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.

सहकार विद्यालयात नाल्याचे पाणी
कळवा पश्चिम परिसरातील कळवा स्टेशन ते पाटबंधारे नाला तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावरून सहकार विद्यालयाच्या आवारात शिरल्याने शाळा लवकर सोडण्यात आली. शाळेतील मुलांचे हाल झाले असून पालकांनी तीन फूट पाण्यातून मुलांना बाहेर काढत घरी नेले.

Updates :

भिवंडीतील टेकडीवरील २६ कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलवले

‍मुंबई : विद्यापीठाची एमए समाजशास्त्र सत्र ३ची दुपारची लेखी परीक्षा पुढे ढकलली; सुधारीत वेळापत्रक लवकरच

मुंबई : विद्यापीठाच्या एमएस्सी सत्र २ व ४ च्या प्रात्यक्षिक परीक्षेस जे विद्यार्थी पोहचू शकले नाहीत त्यांच्या परीक्षा पुन्हा घेणार

मुंबई : ११ वी ऑनलाईन ॲडमिशन; पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश घेण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढ

मुंबई : सँडहर्स्ट रोड स्टेशनवरील धीम्या मार्गाच्या ट्रॅकवर भिंत कोसळली

वसई : पावसाची संततधार; गेल्या तीन दिवसांपासून पांढरतारा पाण्याखाली

विरार : विवा कॉलेज परिसरात पावसाने पाणी साचले; गेल्या काही तासांपासून वीजपुरवठा बंद

रायगड : पेनमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार; पूरस्थिती कायम, शाळा लवकर सोडल्या

ठाणे :  चिल्हार - बोईसर रस्ता पाण्याखाली; वाहतूक धीम्या गतीने सुरु

ठाणे : कळवा रेल्वे स्थानकात पाण्यामुळे रेल्वे सेवा ठप्प होण्याची दाट शक्यता; जलद मार्गावरून प्रवास करण्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे आवाहन

नालासोपारा : वसईत रात्रभर पाऊस; नालासोपारा स्टेशन परिसर जलमय. दुकानात, घरात पाणी शिरले असून चाकरमानी पाण्यातून वाट काढत कामावर

मुंबई : मध्य रेल्वे लोकल 15 मिनिटे तर ट्रान्सहार्बर लोकल 10 मिनिटे उशिरा

ट्रान्सहार्बर लोकल देखील दहा मिनिटे उशिराने 

ठाणे : जिल्ह्यातील नदी नाल्यानी धोक्याची पातळी ओलांडली

वसई,विरार,नालासोपारा नवघर-माणिकपूरसह ग्रामीण भागात मुसळधार 

शिरसाड-वज्रेश्वरी मार्गावर पारोळ येथे पाणी साचल्याने वाहतूक बंद