Thu, Apr 18, 2019 16:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईसह उपनगरात मुसळधार; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले 

मुंबईसह उपनगरात मुसळधार; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले 

Published On: Jul 08 2018 10:52AM | Last Updated: Jul 08 2018 10:52AMठाणे : अमोल कदम

कालपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून यामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. रेल्वेच्यावतीने आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर मध्य रेल्वे मार्गावर  २५/३० मिनीटाने लोकल उशिराने धावत आहेत. टिळकनगर ते कुर्ला दरम्यान पाणी साचल्याने हार्बर रेल्वे पहाटे पासून उशिराने धावत आहेत. पावसामुळे काही लोकल गाड्यामध्ये नादुरुस्त झाल्याने लोकल कारशेडमध्येच दुरुस्ती करिता दाखल असल्याचे रेल्वे कडुन सांगण्यात आले आहे. 

मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. मात्र, मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक मध्ये रेल्वे कामगारांना कामे करणे शक्य होत नसल्याने मेगा ब्लॉक रद्द होण्याची दाट शक्यता आहे. ज्या स्थानकावर पाणी तुंबले आहे. तसेच रेल्वे रुळावर पाणी साचत आहे. त्याच्या बाजूने पाणी नाल्याद्वारे काढण्याचे काम रेल्वे कामगार करत आहेत. तसेच पाणी जाण्याचा मार्गावर कचरा आणि माती जाऊन नाले चॉकअप झाल्याने जेसीपीच्या सहाय्याने पाणी काढण्याचे रेल्वेच्या तीने मध्य रेल्वे मार्गावर प्रयत्न सुरू आहेत. 

आज रविवार सुट्टी असल्याने चाकरमानी घरीच असल्याने लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांची संख्या कमी आहे. परंतु लोकल उशिरा धावत असल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.