Sat, Feb 16, 2019 22:55



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : एलएलएम (सत्र-१) ची परीक्षा २२ जानेवारीपासून

मुंबई : एलएलएम (सत्र-१) ची परीक्षा २२ जानेवारीपासून

Published On: Jan 11 2018 8:57PM | Last Updated: Jan 11 2018 8:57PM

बुकमार्क करा




मुंबई: प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम (सत्र-१) ची परीक्षा २२ जानेवारी २०१८ पासून घेण्यात येणार असल्याचे आज विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आले. या संबंधीचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठामार्फत प्रसिद्ध केले जाणार आहे.  ही परीक्षा १७ जानेवारी २०१८ पासून घेण्यात येणार होती.

एलएलएमच्या विविध विद्यार्थ्यांकडून एलएलएम (सत्र-१) ची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यापीठाकडे निवेदन प्राप्त झाले होते. या अनुषंगाने परीक्षा विभागाने संबंधित अधिष्ठाता आणि प्राचार्य यांचे मत विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेत आता या परीक्षेचे आयोजन २२ जानेवारी २०१८ पासून करण्यात येणार आहे.