Fri, Sep 21, 2018 23:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोनू निगमच्‍या जीवाला धोका; सुरक्षेत वाढ

सोनू निगमच्‍या जीवाला धोका; सुरक्षेत वाढ

Published On: Feb 07 2018 11:19AM | Last Updated: Feb 07 2018 11:19AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

महाराष्ट्र इंटेलिजेन्‍स डिपार्टमेंटने प्रसिध्‍द गायक सोनू निगमच्‍या जीवाला धोका असल्‍याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. सोनू निगमच्‍या हत्‍येचा कट रचला जात असल्‍याची खबर मुंबई पोलिसांना मिळाल्‍यानंतर सोनूच्‍या सुरक्षेत वाढ करण्‍यात आल्‍याचे समजतेय. पोलिसांना गुप्तचर विभागाने पाठविलेल्या अॅडव्हायजरीमध्ये सोनूच्‍या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.

गेल्‍या वर्षी सोनू निगमने अजानवरून विवादित वक्‍तव्‍य केले होते. अजानच्‍या आवाजाला विरोध केल्‍यानंतर काही कट्‍टरपंथीय संघटनांनी सोनूला धमक्‍याही दिल्‍या होत्‍या. आता मुंबई पोलिसांना माहिती मिळाल्‍यानंतर सोनूला स्‍पेशल सिक्‍युरिटी देण्‍यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी अथवा कोणत्‍याही इवेंटमध्‍ये सोनू यांना टार्गेट केले जाऊ शकते, असे गुप्‍तचर विभागाने म्‍हटले आहे, असे सूत्रांकडून माहिती कळते. 

सोनू निगम अजानला केलेल्‍या विरोधामुळे चर्चेत आला होता. यानंतर कट्टरपंथी संघटनांनी निषेध नोंदवत सोनूला मुंडन करण्‍याचे आव्‍हान दिले होते. सोनूनेदेखील मुंडन करून त्‍याचा फोटो सोशल मीडियावर पोस्‍ट केला होता.