Fri, Jul 10, 2020 18:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ; पुन्हा मिळणार मुदतवाढ

लॉ प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ; पुन्हा मिळणार मुदतवाढ

Last Updated: Nov 17 2019 1:23AM
मुंबई : प्रतिनिधी

सीईटी सेलच्या वतीने राज्यभरातील विधी महाविद्यालयात राबविली जाणारी प्रक्रीया लांबली असली तरी विद्यार्थ्यांना प्रवेश देवूनही महाविद्यालयात जावून प्रवेश घेण्याकडे विद्यार्थी कानाडोळा करीत असल्याचे चित्र दुसरीकडे आहे. एकीकडे प्रवेश मिळालेले विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत तर दुसरीकडे गुणवत्तेमुळे प्रवेश न मिळालेले विद्यार्थी प्रवेश मिळावा यासाठी सीईटी सेलच्या कार्यालयात हेलफाटे घातत असल्याचे चित्र आहे. मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

राज्यातील सर्व विद्यापीठांनी हिवाळी सत्राच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करीत असली तरी अद्याप विधी तृतीय वर्ष एलएलबी अभ्?यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे टिका होत असली तरी प्रवेश देवून विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने बहुसंख्य जागा रिक्‍त राहत आहेत.

राज्यभरात असलेल्या शासकीय, अनुदानित विनाअनुदानित, अल्पसंख्याक अशा 141 महाविद्यालयात 15 हजार 100 जागा आहेत. त्या जागावर दावा करणारे राज्यातील विद्यार्थी बहुसंख्य आहेत. आतापर्यंत तीन फेर्‍या पूर्ण होवून त्यानंतर संस्थास्तरावर प्रवेशाची फेरी सुरु आहे. त्याची मुदत 19 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. 

या सर्व फेरीसाठी तब्बल 52 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी दावा केला होता त्यापैकी गुणवत्ता निकषनुसार सीईटी सेलने 18 हजार 597 विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चित केले होते. त्यापैकी आतापर्यंत केवळ 8 हजार 82 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जावून प्रवेश कर्न्फम केले आहेत.

मुंबई विद्यापीठाने लॉ तृतीय वर्षाचे आता प्रवेश सुरु असतानाच आता वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्‍त केला. प्रवेश न घेतल्याने जागा रिक्‍त असल्याने आणि प्रवेशाची मागणी करत असलेल्या विद्यार्थ्यांची रिघही आता सीईटी सेलच्या कार्यालयात लागली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सीईटी सेलच्या वतीने विचार सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून एक अखेरची संधी मिळण्याची शक्यता आहे.