Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण स्थानकातून सुटली लेडीज स्पेशल लोकल

कल्याण स्थानकातून सुटली लेडीज स्पेशल लोकल

Published On: Mar 08 2018 1:37PM | Last Updated: Mar 08 2018 1:37PMकल्याण : प्रतिनिधी 

८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रेल्वे प्रशासनातर्फे ८.०१ मि.कल्याण सीएसएमटी जलद लोकल ही महिला स्पेशल ट्रेन चालवून या लोकल ट्रेनची मोटरमन ,गार्ड ,टिटिई ,रेल्वे सुरक्षा बल अधिकारी हा पुर्ण स्टाफ महिला कर्मचारी तैनात केले होते .ही लोकल ट्रेन फुलांनी सजविलेली होती.

कल्याण स्थानकातून दररोज सकाळी ८ वाजून १ मिनिटांनी सीएसएमटीसाठी लेडीज स्पेशल लोकल सुटते. आज महिला दिनानिमित्त महिला मोटरमन मुमताज काझी आणि महिला गार्ड मयुरी कांबळे यांनी ही लोकल सीएसएमटीपर्यंत नेली.ट्रेनची मोटरमन ,गार्ड ,टिटिई ,रेल्वे सुरक्षा बल अधिकारी हा पुर्ण स्टाफ महिला कर्मचारी तैनात करण्यात आल्या होत्या. यानिमित्तानं रेल्वेच्या आणि प्रवासी संघटनांच्या वतीनं या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कुटुंबीय आणि रेल्वेचे अधिकारी, सहकारी यांच्या पाठींब्यामुळेच आजवर काम करू शकल्याचं या महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

यावेळी कल्याण स्टेशन डायरेक्टर विरेश्वर सिंह ,मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के.सिंग व कल्याण स्थानक प्रबंधक प्रदीपकुमार दास आदी अधिकारी उपस्थित होते .यावेळी महिला प्रवाशानी दैनंदिन रेल्वे प्रवासात भेडसाविणा-या समस्या या प्रवासात त्यांची होणारी मानसिक कुचंबणा यावर लक्ष वेधले .या महिला प्रवाशांकरिता महिला स्पेशल लोकलची संख्या वाढविणे ,कल्याण पुढील सर्व लोकल १५ डब्बा करणे व त्यात महिलांच्या डब्यांची संख्या वाढविणे , स्थानकात फलाटांच्या दोन्ही बाजूला त्यांच्याकरिता शौच्छालय बांधणे , महिला डब्याजवळ फलाटावर आरपीएफ पोलिस तैनात करणे ,संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वा.पर्यंत कटाक्षाने सर्व महिला डब्यात पोलिस कर्मचारी तैनात ठेवणे , पादाचारी पुल वा फलाटांवरी गर्दी यात महिला प्रवाशांचे वाढते विनयभंग रोखणे ,प्रत्येक डब्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही सह पैनिक बटण बसविणे ,महिला डब्यात फेरीवाले ,भिकारी वा पुरूष प्रवासी बिनदोक्तपणे  प्रवास करतात त्यावर ताबडतोब प्रतिबंध आणणे ,फलाटांवर गाडीची प्रतिक्षा करताना प्रवाशांना रांगेत उभे करून प्रोत्साहित करणे जेणेकरून गर्दीत लोकलमध्ये चढताना वा उतरताना होणारे अपघात ,वादविवाद टाळता येतील या विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले. 

याशिवाय कल्याण यार्ड या महत्त्वकांक्षी प्रकल्पाबाबत माहिती घेण्यात आली त्यानुसार या यार्डच्या जागेचे सर्वेक्षण होऊन येत्या महिनाभरात या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती स्थानक प्रबंधक दास यांनी संघटनेला दिली .यावेळी रेल्वे अधिकारी विरेश्वर सिंग  यांनी महिला ट्रेन वाढवण्याची मागणी आहे त्याचा प्रशासन विचार करेल मात्र फर्स्ट क्लास चे डब्बे वाढवण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले