Sat, Jul 20, 2019 10:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोयना एक्स्प्रेसचा एसी डब्बा अचानक जनरल (व्‍हिडिओ)

कोयना एक्स्प्रेसचा एसी डब्बा अचानक जनरल (व्‍हिडिओ)

Published On: Dec 02 2017 11:31AM | Last Updated: Dec 02 2017 11:44AM

बुकमार्क करा

ठाणे : अमोल कदम

मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. शनिवार सकाळ ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी गाडी क्र. ११०२९ मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेसला कोच नंबर सी वन एसी चेअर कोच ऐवजी जनरल डब्बा लावल्यामुळे एकच गोंधळ उडाला. सर्व जनरल बोगीवाले प्रवासी यामध्ये चढले. डब्यामध्ये एसी तर नाहीच पण रिझर्वेशन केलेल्या प्रवाशांना याचा खूप त्रास सहन करावा लागला.
कोयना एक्स्प्रेसचा एसी कोच डब्बा मुंबई स्थानकापासून जनरल डब्बा केल्याने कल्याण स्थानकात प्रवाशांचा गोंधळ निर्माण झाला. यामध्ये आरक्षण केलेल्या प्रवासी व जनरलमधून प्रवास करणार्‍यांमध्ये वाद झाले. यावेळी एसी डब्बा जनरल केल्यानंतर दादर ते कल्याणपर्यंत गाडी आली असता कल्याण स्थानक येथे एसी डब्बा जनरल करण्यात येत असल्याचे रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले व यावेळी दिलगिरीही व्यक्त करण्यात आली.

मुंबई सीएसएमटीवरून गाडी निघाली असता कोयना एक्स्प्रेसचा डब्बा एसी कोच होता, परंतु तो डब्बा जनरल करण्यात आला, त्यामुळे कल्याण स्थानक येथे एसी डब्बा जनरल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे एसी कोचमध्ये जनरल मोठी गर्दी झाली. यावेळी आरक्षण केलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराजी व्यत्त केली. अचानक असा निर्णय घेण्यात आल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. यावेळी अनिता झोपे यांनी रेल्‍वे प्रशासनाच्या या निर्णयाचा मोठा मनस्थाप आरक्षण केलेल्या प्रवाशांना करावा लागल्याची भावना व्‍यक्‍त केली.