Sun, Jul 21, 2019 15:08
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्र बंद: कुठे काय घडले वाचा दिवसभरातील अपडेट

महाराष्ट्र बंद: कुठे काय घडले वाचा दिवसभरातील अपडेट

Published On: Jan 03 2018 9:46AM | Last Updated: Jan 03 2018 6:35PM

बुकमार्क करा
मुंबईः पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यभरात मोठी आंदोलने झाली. या बंदाचे पडसाद राज्यापासून ते संसदेतील सभागृहात देखील उमटले.   

अपडेट

*मुंबई  : चेंबूरच्या खारदेवनगर मधील घाटला व गोवंडी ब्रिज येथे दोन गटामध्ये  दगडफेक,पोलिसांचा चारवेळा  लाठीमार

*गोरेगाव रेल्वे स्थानकात पुन्हा रेल रोको, प्लेटफार्मवर प्रवाशांची गर्दी

*जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड पूर्णपणे बंद, पंचिम द्रुतगती महमार्गाजवळ जोगेश्वरी जंक्शन कडून पवईकडे जाणारी वाहतूक ठप्प

*रायगड : महाड शहरातील दुकानांची तोडफोड प्रकरणी पोलिस प्रशासनाकडून महाडकर नागरिकांना नुकसानी विरोधात संबंधितांची चौकशी करून कारवाईचे आशवासन

*दादर शिवाजी मंदिरसह मुंबईतील नाट्यगृहातील प्रयोग रद्द

*छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे वाहतूक खोळंबली

*साडेपाच तासापासून बंद असलेला इस्टर्न एक्सप्रसवे सुरु

*नांदेड जिल्हा : हदगाव आष्टी येथे पोलिस लाठीचार्ज मध्ये हल्ल्यात दहावीला शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

*मध्य रेल्वे सुरळीत सुरू झाली आहे, गड्या खोळंबल्या असल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू 

*भिडे आणि एकबोटे यांना सरकारने अटक करावी- प्रकाश आंबेडकर

*काही हिंदू संघटना अराजक माजवतायत- प्रकाश आंबेडकर  

*भिडे आणि एकबोटे यांच्यावर 302 कलमानुसार खटले दाखल करा- प्रकाश आंबेडकर

*बंद यशस्वी केल्याबद्दल नागरिकांच आभार- प्रकाश आंबेडकर 

*बंद मागे घेत असल्याची प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत घोषणा 

*बंद मागे घेत असल्याची प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत घोषणा 

*काही हिंदू संघटना गोधळ निर्माण करत आहेत- प्रकाश आंबेडकर

*महाराष्ट्र बंद संदर्भात प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद सुरु

*कल्याणमध्ये अनेक भागात चक्का जाम आंदोलन 

* भीमा कोरेगाव प्रकरण : चेंबूरच्या खारदेवनगरात तुरळक दगडफेक, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात, दगडफेक थांबवण्यास पोलिसांचे प्रयत्न

*भीमा कोरेगाव प्रकरण : विक्रोळी lBS मार्गावर वाहनांची प्रचंड तोडफोड

*भीमा कोरेगाव प्रकरण : कोल्हापूरमधील सिद्धार्थ नगर मध्ये दगडफेक 

*भीमा कोरेगाव प्रकरण : सायन पनवेल महामार्गावर कळंबोली वसाहती जवळ आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांवर दगडफेक 

* ठाणेः लोकमान्यनगर येथे आंदोलकानी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन

*नंदुरबारमध्ये कडकडीत बंद,  सिन्नर येथे रास्ता रोकोचा प्रयत्न पोलिसांनी उधळला.

*कांदिवली पश्चिम द्रुतगती महामार्ग बंद! द्रुतगती महामार्ग रोखला. अनेक वाहनचालक अडकले. बेस्ट बस, खाजगी वाहतूक सेवांवर परिणाम! जय भीमचा नारा! हल्लाखोरांना  अटक करण्याची मागणी.

* महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील AC लोकलच्या फे-या सुरक्षेच्या कारणामुळे दिवसभर रद्द करण्यात आल्या आहेत.

*ठाण्यातील कळवा नाका येथे दीड तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू, सर्वत्र चक्काजाम

*कोल्हापूरात तरूण भारत दैनिकाच्या कार्यालयाची जमावाकडून तोडफोड
 
*ठाणेः आक्रमक आंदोलक ठाणे महापालिका गेटवर आले आणि महापालिका बंद करण्याची मागणी केली

*मुंबईः मध्य रेल्वेची सेवा पुर्णपणे ठप्प, सर्व जागी आंदोलने सुरु, डोंबिवली, ठाणे, कांजुर, घाटकोपर, विक्रोली, कुर्ला, दादर, सर्व स्थानके बंद

*कोल्हापूरः दसरा चौकात तुफान दगडफेक,महाद्वार रोडवर सौम्य लाठीमार, पोलिसांनी केली कारवाई

*नाशिकः नाशिकरोड परिसरात विहितगाव,दसक, सिन्नर फाटा येथे प्रचंड तणाव

*औरंगाबादः  एसटी बस प्रवाशांच्या प्रतीक्षेत सकाळपासून एकही बस धावली नाही. बसस्थानकात केवळ एसटीचे अधिकारी कर्मचारीच उपस्थित आहेत.

*नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद सर्व दुकाने बंद, हिमायतनगरमध्ये बंदला हिंसक वळण गाड्यांची तोडफोड

*सोलापूर : माजी आमदार नरसय्या आडम मास्तर सहित 30 कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज...

*नाशिकः म्हसरुळ येथे रॅली ,आरटीओ कॉर्नर येथे रस्ता रोको

*औरंगाबादः आंबेडकरनगरात तणाव, शहागंज सराफा भागात काही युवकांनी दुकाने बंद केली, पोलीस मागे लागताच युवक पसार, कैलासनगर मध्ये मोठा जमाव रस्त्यावर दुकाने बंद करीत आहे

*मुंबईः  चेंबूर नाका नाका येथे काही अज्ञात आंदोलनकर्त्यांनी तोंडाला रुमाल लावून बेस्ट बसची तोडफोड केली.

*मुबंई-पुणे महामार्गावर तळेगाव येथे रास्ता रोको

*मुंबई : उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. दुपारी 3 वाजता होणाऱ्या पेपरलाही ही मुभा दिली आहे

*नाशिकः कळवण तालुक्यात सर्वच व्यवहार सुरळीत सुरू, शाळाही सुरू

*कोल्हापूरः गोकुळ हॉटेलवर दगडफेक, बिंदु चौकात मोठा पोलिस बंदोबस्त

*सोलापूरः अक्कलकोट शहरात कडकडीत बंद, शाळा, बाजारपेठा बंद 

*कोल्हापूरः मध्यवर्ती बसस्थानकावर मोठा फौजफाटा, शिवाजी पुलावर रास्तारोको 

*उस्मानाबाद : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात कडकडीत बंद. उस्मानाबाद शहरात सर्व व्यवहार ठप्प. आंदोलन शांततेत. 

*सोलापूरः माढा येथे कडकडीत बंद. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन

*कोल्हापूरः राजारामपूरीत केमटीवर दगडफेक 

*सोलापूरः पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी शहरात फिरुन नागरिकांशी संवाद साधत आहेत. शांतता राखण्याचे आवाहन.

*नाशिकः कळवण तालुक्यात बस सेवा सुरळीत सुरू

*कोल्हापूरः बंदला प्रतिसाद, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी रोड, गुजरी परिसरासह व्यापारी पेठातील दुकाने उस्फूर्तपणे बंद, काही शाळा बंद, जनजीवन सुरळीत

*मराठवाडाः वाशी- उस्मानाबाद एसटीवर सकाळी उस्मानाबादला जाताना दगड फेक

*साताराः लोणंद बंदला सकाळ पासूनच चांगला प्रतिसाद. बहुतांश दुकाने सकाळपासुनच बंद ठेवण्यात आली आहेत.

*ठाणेः  विरार पश्चिम भागातील रिलायन्स फ्रेश शॉपिंग मॉल रिपाई कार्यकर्त्यानी बंद पाडले

*नाशिकः आगारातून धावणार्‍या जवळपास ५० टक्के बस रद्द, रेल्वे सेवा सुरळीत. रिक्षा चालकांची मात्र छप्पर फाडके कमाई.

*सांगली : भारिप, रिपाई आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने सांगली जिल्हा बंदचे आवाहन, सांगलीतील प्रमुख बाजारपेठा बंद, बंदच्या पार्श्वभूमीवर शाळेनां सुट्टी, बसेस सेवा बंद. 

*वाटेगांव, कासेगांव, शिराळा उत्तर विभागात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

*भीमा-कोरेगाव प्रकरण : ठाण्यात ४ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश (कलम १४४) लागू

*भीमा-कोरेगाव प्रकरण : वाशिममध्ये सुरक्षेच्या कारणामुळे शाळा, बाजारपेठ, एसटी बस सेवा बंद  

*दौलताबादमधील देवगिरी शाळेसमोर सहलीच्या बसवर दगडफेक; एक शिक्षक व मुलगा जखमी

*साताराः सुरक्षिततेच्या कारणावरून फलटणची बस सेवा बंद

*मुंबई: मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक सुरू

*आकोल्‍यात शाळा आणि कॉलेज बंद 

*नाशिकः सटाणा आगाराची संपुर्ण बससेवा बंद करण्यात आली आहे.

* पुणे: महाराष्ट्र बंद आंदोलन; पुणे-सातारा विना वाहक, पुणे-बारामती एसटी बसेस बंद

*ठाणेः आंदोलनामुळे लोकल वाहतूक विस्कळीत

*कोल्हापूरः भीमा कोरेगाव प्रकरण, गोरगोटी-कोल्हापूर रस्ता बंद

*सोलापूरः भीमा कोरेगाव प्रकरणी माळशिरसमध्ये कडकडीत बंद 

*मुंबईः राज्यातील विविध आगारांतील एसटी सेवा सकाळपासून बंद 

*नाशिकः लासलगाव बंदला हिंसक वळण, मनमाड-लासलगाव जाणारी बस आंदोलकांनी दगडफेक करून फोडली, जाळण्याचाही झाला प्रयत्न

*औरंगाबादमध्ये एसटी बसची वाहतूक पूर्णपणे बंद 
 

संबंधित बातम्या

जिग्नेश मेवानींची मुंबईतील सभा रद्द

ठाण्यात बंदमुळे जनजीवन विस्कळीत 

नवी मुंबई बाजारसमितीला बंदचा फटका

कोल्हापुरात दगडफेक; पोलिसांचा सौम्य लाठिमार (व्हिडिओ)

भीमा-कोरेगाव प्रकरण : सांगलीत बाजारपेठा आणि एसटी बंद(व्हिडिओ) 

सातारा कडकडीत बंद : प्रवाशांचे हाल

भीमा-कोरेगाव प्रकरण : कराडात कडकडीत बंद(व्हिडिओ) 

भीमा-कोरेगाव प्रकरण : सोलापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद(व्हिडिओ)

भीमा-कोरेगाव प्रकरण : लासलगावात विद्यार्थी बस फोडली 

भीमा कोरेगावचे राज्यात पडसाद; कोठे काय घडले?

भीमा-कोरेगाव हे सरकारचे अपयश : पृथ्वीराज चव्हाण

भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

फूट पाडणाऱ्यांचा डाव हाणून पाडा : अशोक चव्हाण

घटनेची चौकशी न्यायाधीशांमार्फत होणारः मुख्यमंत्री (Video)