Mon, May 27, 2019 07:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उन्हाळ्यात कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष सहा फेर्‍या

उन्हाळ्यात कोकणवासीयांसाठी मध्य रेल्वेच्या विशेष सहा फेर्‍या

Published On: May 02 2018 1:18AM | Last Updated: May 02 2018 12:35AMमुंबई : प्रतिनिधी 

दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये कोकणामध्ये जाणार्‍या प्रवाशांची गर्दी उसळते. यानुसार यंदाही कोकणात जाणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने यंदा मध्य रेल्वेने कोकण मार्गावर सहा उन्हाळी विशेष फेर्‍या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सीएसएमटी ते करमाळीदरम्यान दोन, पनवेल ते करमाळी सुपरफास्ट स्पेशल चार फेर्‍या अशा एकूण सहा फेर्‍या चालविल्या जाणार आहेत.   

स ट्रेन क्रमांक 01127 ही सीएसएमटी ते करमाळी सुपरफास्ट स्पेशल गाडी बुधवार 2 मे रोजी सीएसएमटीहून रात्री 12.20 वाजता सुटेल आणि करमाळीला सकाळी 11.30 वाजता पोहचेल. ट्रेन क्रमांक 01128 ही परतीच्या प्रवाशांसाठी ट्रेन शुक्रवारी 4 मे रोजी करमाळी येथून सकाळी 10.20 का. सुटेल आणि सीएसएमटीला त्याच दिवशी रात्री 11.15 का. पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत.

स ट्रेन क्रमांक 01129 - ही स्पेशल ट्रेन बुधवारी 2 मे रोजी पनवेलहून रात्री 11.40 वाजता सुटेल आणि करमाळीला सकाळी 9 वाजता पोहचेल. ट्रेन क्र. 01130 ही परतीच्या प्रवासासाठीची स्पेशल ट्रेन बुधवारी 2 मे रोजी करमाळीहून दुपारी 2 वाजता सुटून पनवेल येथे 10.40 वाजता पोहचेल. या गाडीला रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत.

स ट्रेन क्र. 01131 - ही स्पेशल ट्रेन गुरुवार 3 मे रोजी पनवेलहून रात्री 11.40 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता करमाळीला पोहचेल. ट्रेन क्र. 01132 - ही परतीच्या प्रवासाची ट्रेन गुरुवार दि. 3 मे रोजी करमाळीहून दुपारी 1.40 वाजता सुटून पनवेल येथे त्याच दिवशी रात्री 10.15 वाजता पोहचेल. या गाडीला रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम येथे थांबे असणार आहेत. या सर्व गाडयांचे आरक्षण 1 मेपासून उपलब्ध होणार आहे.