Sat, Apr 20, 2019 09:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लाँग मार्च : शेतकर्‍यांचा सरकारला दोन वाजेपर्यंत अल्‍टिमेटम

लाँग मार्च : शेतकर्‍यांचा सरकारला दोन वाजेपर्यंत अल्‍टिमेटम

Published On: Mar 12 2018 10:53AM | Last Updated: Mar 12 2018 10:53AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

नाशिकहून निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा शेतकरांचा लाँग मार्च आता अंतिम टप्‍प्यात पोहचला आहे. मुंबईत पोहचलेल्या या लाँग मार्चमधील शेतकर्‍यांनी रविवारी रात्रभर चालत आझाद मैदानावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. 

या दरम्याने शेतकर्‍यांनी सरकारला दोन वाजेपर्यंत अल्‍टीमेटम दिला आहे. शेतकर्‍यांच्या दुपारी मागण्या मान्‍य झाल्या नाही तर विधानभवनावर शेतकरी धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता शेतकर्‍यांचे शिष्टमंडळाला विधनभवनात चर्चेसाठी बोलविण्यात आले आहे. यावेळी सीताराम येच्युरी यांचे भाषण होणार आहे. जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी शेतकर्‍यांना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचे अश्वासन दिले आहे. या मोर्चात तीस हजारांहून अधिक शेतकरी सामील झाले आहेत. मागण्या मान्‍य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही असा निर्धार लाँग मार्चमधील शेतकर्‍यांनी केला आहे.