Sun, Sep 23, 2018 19:38



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › किसान मोर्चा सोमवारी विधानभवनावर धडकणार 

किसान मोर्चा सोमवारी विधानभवनावर धडकणार 

Published On: Mar 10 2018 7:42PM | Last Updated: Mar 10 2018 7:42PM



मुंबई : प्रतिनिधी

कोणत्याही अटींशिवाय कर्जमाफी, शेतमालासाठी योग्य भाव यासह आदी मागण्यासाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर म्हणजेच भिवंडीत येऊन धडकला आहे. या मोर्चात हजारो शेतकऱ्यांचा समावेश आहे. १२ मार्चला (सोमवारी) हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. 

नाशिकहून सुरू झालेला हा मार्चा आज भिवंडी येथे आला असून, आज या मार्चाचा मुक्काम भिवंडीत असणार आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून राज्य तसेच केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत.  शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप झाला, त्यावेळी शासनाने पूर्ण कर्जमाफी जाहीर केली. तर, ३४ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, यातील १० ते १५ टक्के सुध्दा कर्जमाफी झाली नाही.  यासर्व गोष्टीमुळे राज्य सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप किसान सभेत करण्यात आला. 

३० हजारांपेक्षा जास्त शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत. आस्मानी संकट आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आयुष्य संपवण्याचीही वेळ येते आहे. अशात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफीही फसवी आहे. त्यामुळेच सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

काय आहेत मागण्या?

शेतकरी कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्याच्या नावावर कराव्यात
कोणत्याही अटी आणि शर्थी यांच्याशिवाय कर्जमाफी
शेती मालाला दीडपट हमीभाव
स्वामिनाथन आयोगातील रास्त शिफारसींची अंमलबजावणी
वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी
या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी १२ मार्चला किसान सभेचा हा भव्य मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. या मोर्चानंतर सराकर शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्