Sun, Mar 24, 2019 08:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेतकऱ्यांचा लाल हुंकार मुंबईत; वाहतूक व्यवस्थेत बदल

शेतकऱ्यांचा लाल हुंकार मुंबईत; वाहतूक व्यवस्थेत बदल

Published On: Mar 11 2018 11:20AM | Last Updated: Mar 11 2018 11:20AMमुंबई : प्रतिनिधी 

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे काढण्यात आलेल्या हजारो शेतकर्‍यांचा मोर्चा 12 मार्च रोजी विधानभवनावर धडकणार असल्याने शहरात वाहतूक कोंडी, तसेच कायदा व  सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी वाहातूकीच्या काही मार्गात बदलसुद्धा केले आहेत. 

शेतकर्‍यांचा मोर्चा रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलूंड पुर्वेकडील आनंदनगर टोलनाक्यावरुन शहरात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानुसार याठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव बलाच्या मदतीने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. 

अशी असेल वाहतुक व्यवस्था...

>शहरात प्रवेश केल्यानंतर हा मोर्चा पुर्व द्रुतगती मार्गाने विक्रोळी, रमाबाई आंबेडकर नगर, छेडानगर, अमर महल जंक्शन आणि सुमननगर मार्गे रात्री नऊच्या सुमारास सायनमधील सोमय्या मैदान येथे पोहचणार आहे. 

>या मोर्चामध्ये राज्यभरातून हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याने मुलूंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, सायन विभागातील स्थानिक पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.

>शेतकर्‍यांच्या मोर्चाच्यावेळी पूर्व द्रुतगती मार्गावरील एक हलक्या वाहनांसाठी मोकळी ठेवण्यात आली आहे.  या वाहनांची वेग मर्यादेवर ताशी 20 किलोमीटरचे बंधन वाहतूक पोलिसांनी घातले आहे.

>मोर्चामध्ये मोठ्याप्रमाणामध्ये शेतकरी सहभागी होणार असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.

>मोर्चाच्या वेळी ट्विटर, एफ. एम. रेडीयो, प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून याची माहिती देण्यात येणार आहे. मोर्चाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बंद करण्यात आलेले मार्ग

>रवीवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत पुर्व द्रुतगती मार्गाची दक्षिण वाहीनी मुलूंडच्या आनंदनगर टोलनाक्यापासून सायनच्या सोमय्या मैदानापर्यत सर्वप्रकारच्या अवजड व माल वाहतूक करणार्‍या वाहनांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.

>वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग रविवारी सकाळपासून शहरात येणारी सर्व प्रकारच्या अवडज आणि माल वाहतूक वाहने कळवा, विटावा, एरोली आणि वाशी खाडी पूलमार्गे वळविण्यात आली आहेत. पुर्व द्रुतगती मार्गावरुन ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहाने वाशी खाडी पूलमार्गे एरोली, विटावा, ठाणे अशी वळविण्यात येणार आहेत.

वाहतुकीत बदल

>सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पूर्व द्रुतगती मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.

>मुलुंड ते सोमय्या मैदान- चुनाभट्टीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची पदयात्रा सुरु असताना एक मार्ग छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा असेल. वाहनांना वेगमर्यादा ताशी 20 कि.मी. ठेवण्याचे बंधन असणार आहे.

>मुंबईहून ठाण्याला जाणारी अवजड व माल वाहतूक करणारी वाहने वाशी खाडीपूल, ऐरोली, विटावा मार्गे ठाणे अशी वळवण्यात येणार आहेत.

>शेतकरी पदयात्रेच्या दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने या मार्गाचा वापर करणे शक्यतो टाळावे असे पोलिसांचे आवाहन केेले आहे.

>लालबहादूर शास्त्री मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग याचा वापर करावा लागणार.