Tue, Apr 23, 2019 22:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पायातून रक्त आले तरी थांबले नाही ‘लाल’ वादळ (फोटो)

पायातून रक्त आले तरी थांबले नाही ‘लाल’ वादळ

Published On: Mar 12 2018 12:26PM | Last Updated: Mar 12 2018 12:34PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

नाशिकपासून सुरू झालेला प्रवास मुंबई गाठेपर्यंत थांबणार नाही. अखंडपणे चालावं लागणार, काही दुखलं खुपलं तरी  थांबून चालणार नाही. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला याची खात्री होती. पाय थकले, सुजले, तर थांबायच विसावा घ्यायचा पायावर थंड पाणी घ्यायचं आणि पुन्हा चालायचं..पायातून रक्त आले तरी त्या रक्ताचा रंगही लालच...आमच्या लाल वादळात त्या रक्ताचाही समावेश होतोय असं म्हणून प्रत्येक शेतकरी पूढे कूच करत होता.

वर्षानुवर्षे आपल्या मागण्यांसाठी झगडणार्‍या शेतकर्‍यांनी नाशिकपासून सुरू केलेल्या लाँग मार्चने काल मुंबईत प्रवेश केला आणि मुंबईचा इस्टर्न फ्री वे लालजर्द रंगाने फुलून गेला. या किसान मोर्चाचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. भेगा पडलेले पाय, तुटलेली चप्पल, रक्ताने माखलेले चप्पल...हि चित्रे मन हेलावून टाकणारी आहेत.

सोमवारी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना अडचण ठरू नये. यासाठी स्वत:च्या मागण्यांचा विचार करताना या शेतकऱ्यांना उज्वल भविष्य घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये अडसर ठरायचे नव्हते. म्हणूनच त्यांनी रात्रीच आझाद मैदानाकडे कूच केली. 

Image may contain: one or more people

Image may contain: one or more people and shoes

Image may contain: one or more people and shoes

Image may contain: one or more people

Image may contain: one or more people

Image may contain: one or more people and outdoor

Image may contain: 4 people, people smiling, hat, crowd and outdoor

Image may contain: one or more people, crowd, flower and outdoor

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor

Image may contain: 3 people, people standing, crowd and outdoor

Image may contain: 6 people, people smiling, people standing