Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › की-बोर्डच्या कीजने साकारले अब्दुल कलाम

की-बोर्डच्या कीजने साकारले अब्दुल कलाम

Published On: Jan 26 2018 7:39AM | Last Updated: Jan 26 2018 7:39AMमुंबई : प्रणीत पवार

कागदी कप, कॅसेट आणि सीडीजमधून मोझेक प्रतिमा साकारणारा जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सचा माजी विद्यार्थी पवईकर चेतन राऊत याने संगणकाच्या कि-बोर्डमधील किजच्या सहाय्याने भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची हुबेहुब प्रतिमा साकारली आहे. पवईच्या हिरानंदानी गार्डन येथील चौकात ही प्रतिकृती २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत पहावयास मिळणार आहे. या प्रतिकृतीसाठी तब्बल ८७ हजार किज लागल्या. या कलाकृतीद्वारे चेतन आता ४ था विश्वविक्रम करणार आहे. 

हे मोझॅक तयार करताना कोणतीही ड्रॉईंग न करता चित्र काढण्यात आल्याचे चेतन सांगतो. आधी कॅसेटपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सीडीजपासून छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा साकारल्या आहेत. तर यंदाच्या टेकफेस्टमध्ये कागदी कपपासून चेतनने कॅसल तयार केला होता. तसे चेतनच्या थ्रीडी इफेक्टच्या कलाकृतीही जगप्रसिद्ध आहेत. आता त्याने कीजमधून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साकारले आहेत. २६ जाने ते ३१ जाने. पर्यंत ही कलाकृती पाहण्यास खुली आहे. 

दरम्यान, कीज गोळा करण्यासाठी चेतन कुठे-कुठे फिरला? प्रतिमा साकारण्यास त्याला किती वेळ लागला? या प्रतिमा करण्यास कोणाची मदत झाली? किती वेळ लागला? आठवडाभर कोणते राजकीय व्यक्तिमत्व, वलंयाकित सेलेब्रेटीज येणार?  या कलाकृतीच चेतन नंतर काय करणार आहे? या प्रश्नांची उत्तर हवी असल्यास प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी ध्वज संचलन कार्यक्रमानंतर सकाळी १० वाजता हे प्रदर्शन खुले राहणार असून चेतन आणि त्याची टीम याठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे.