Sat, May 30, 2020 00:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्नाळा बँक घोटाळा; माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा 

कर्नाळा बँक घोटाळा; माजी आमदारासह ७६ जणांवर गुन्हा 

Last Updated: Feb 18 2020 4:01PM

संग्रहित फोटो
नवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात अध्यक्ष व माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यासह 76 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

►NPR, NRC विरोधात विधीमंडळात ठराव करावा, महिलांचे पवारांना साकडे 

सहकार कायद्यानुसार सहकार निबंधक उमेश तुपे यांनी 512 कोटींचा घोटाळा केल्‍या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार हा गुन्हा सोमवारी रात्री उशीरा दाखल करण्यात आला.  

►फेररे उड्डाणपूल बंद; फॉकलंड उड्डाणपुलाची कोंडी

गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आमदार प्रशांत ठाकुर, महेश बालदी आणि किरिट सोमय्या यांनी पोलिस आयुक्त संजयकुमार यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. गेल्या आठवड्यात याबाबत सहा हजार ठेवीदारांसह संघर्ष समितीच्या वतीने पनवेलच्या रॅकवर मोर्चा काढण्यात आला होता. आतापर्यंत कर्नाळा  बँकेकडून ठेवीदारांना चार हजार देण्‍यात आले आहेत. 

►नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ जन्मस्थळी भव्य तीर्थस्थळ व पर्यटनसृष्टी व्हावी