Wed, Sep 19, 2018 22:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आरपीएफ जवानाने प्रवासी महिलेची काढली छेड

आरपीएफ जवानाने प्रवासी महिलेची काढली छेड

Published On: Jun 20 2018 3:50PM | Last Updated: Jun 20 2018 3:50PMकल्याण : वार्ताहर

कल्याण रेल्वे  स्थानकावर आपल्या तान्हुल्याला घेऊन गाडीची वाट पाहणाऱ्या एका महिला प्रवाशाची छेड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने रेल्वे स्थानकावर महिला सुरक्षित नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सुरक्षेची जबादारी असनार्‍या आरपीएफ जवानाच्या या संतापजनक कृत्यामुळे आरपीएफची लक्‍तरे वेशीवर टांगली आहेत.

रेल्वे स्थानकावर आणि गर्दीच्या ठिकाणी काही टवाळखोरांकडून महिलांची छेड काढण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्‍या आहेत.  परंतु कल्याणच्या रेल्वे स्थानकात चित्रित केलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओमध्ये कर्तव्यावर असलेला आरपीएफ जवानचं महिलेची छेड काढत असल्याचे दिसून आल्याने रक्षकच भक्षक झाल्याचे समोर आले आहे. कल्याणच्या रेल्वे स्थानकात चित्रित केलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि ही गंभीर बाब उघड झाली. कल्याणच्या रेल्वे स्थानकातील ४ नंबर फलाटावर एका महिलेची छेड काढताना चे दृश्य या व्हिडिओतून स्पष्ट दिसून येत आहे. महिलेच्या मांडीवर एक बाळ आहे आणि आरपीएफ जवान तिच्या पाठीवरून हात फिरवताना दिसून येत आहे. हे धक्‍कादायक दृश्य एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये टिपले आणि आणि या महिलेची छेड काढणाऱ्या आरपीएफ जवानाला स्थानकातील प्रवाश्यांच्या मदतीने चोप दिला. व्हायरल झालेला व्हिडीओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागल्यानंतर या आरपीएफ जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या रेल्वे पोलीस या महिलेचा शोध घेत असून मोबाईल मध्ये व्हिडीओ टिपणाऱ्या युवकाचा शोध स्थानकावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे .