Fri, Sep 21, 2018 02:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षा चालकांकडून महिला कॉन्स्टेबलला धक्काबुक्की

रिक्षा चालकांकडून महिला कॉन्स्टेबलला धक्काबुक्की

Published On: Mar 07 2018 7:01PM | Last Updated: Mar 07 2018 7:05PMकल्याण : वार्ताहर 

जागतिक महिला दिन उद्या मोठय़ा थाटामाटात साजरा केला जाणार आहे. मात्र या दिनाच्या आदल्यादिवशी रेल्वे सुरक्षा  दलात कार्यरत असलेली महिला सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. 

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे रस्त्यात उभ्या केलेल्या रिक्षांविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या निलम गुप्ता या महिला कर्मचाऱ्याला रिक्षा चालकांनी धक्काबुक्की केली. तसेच तिला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला आहे. या धक्काबुक्की प्रकारामुळे महिलांचा महिला दिनाच्या आदल्या दिवशीच अनादर करण्यात आला. 

कल्याण आरपीएफने दोन्ही रिक्षा चालकांचा विरोधात कारवाई करून सोडून दिले. विशेष म्हणजे या घटनेतून रिक्षा चालकांची मुजोरी उघड झाली आहे.