Fri, Sep 21, 2018 15:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : डबक्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

कल्याण : डबक्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Published On: Jul 10 2018 5:35PM | Last Updated: Jul 10 2018 5:35PMकल्याण : वार्ताहर 

पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी घडली. ही घटना पूर्वेकडील एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीच्या बाजूला उघडकीस आली. याप्रकरणाची डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अनिकेत यादव (वय १३) असे मृत मुलाचे नाव असून, तो डोंबिवली पूर्वेकडील इंदिरानगर झोपडपट्टीत राहत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पोहोण्यास जात असल्याचे सांगून अनिकेत घराबाहेर पडला होता. मात्र काही तासानंतर अनिकेत घरी न आल्याने घरच्यांनी आजूबाजूच्या परिसरात त्‍याचा शोध सुरु केला. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा भावाला एमआयडीसी येथील पाण्याच्या टाकीच्या बाजूकडील डबक्यात अनिकेत मृतदेह तरंगताना आढळून आला. अजितने तात्काळ घरच्यांना यांची माहिती दिली. रामनगर पोलिसांना कळविल्यानंतर अनिकेतचा मृतदेह डबक्यातून बाहेर काढण्यात आला.अनिकेतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.