Mon, Jun 17, 2019 14:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २७ गावातील पाणी प्रश्न सोडविणार : आमदार सुभाष भोईर

२७ गावातील पाणी प्रश्न सोडविणार : आमदार सुभाष भोईर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कल्याण वार्ताहर 

कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार सुभाष भोईर यांनी साडेतीन वर्षात केलेली विकास कामे आणि प्रस्तावित कामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजत केले होते. या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष भोईर यांनी २७ गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अधिवेशनात दिवा, दातिवली आणि २७ गावातील पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका असून मतदार संघात ७५१ कोटींची विकास कामे मंजूर झाल्याची माहिती त्‍यांनी यावेळी दिली. पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी ३ एप्रिल रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली आसल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

२७ गावे पालिकेत समाविष्ट झाली असली तरी अद्याप या गावतील पाणी प्रश्न सुटला नाही. ही समस्या सुटावी म्हणून आमदार सुभाष भोईर यांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली आहे. विधिमंडळात पाणीप्रश्नावर औचित्याच्या मुद्याद्वारे सातत्याने आवाज उठवला आहे. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले होते. ३ एप्रिल रोजी मंत्रालयात या प्रश्नाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यात येईल असा आमदार भोईर यांनी संगीतले. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ११५ कोटी ४७ लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून १५ कोटी ८० लाख ८४ हजार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १३ कोटी ३१ लाख , महावितरण माध्यमातून ४३ कोटी, आमदार निधीतील सन २०१७-१८ ची कामे १ कोटी ६८ लाख, आमदार निधीतील सन २०१६-१७ ची २ कोटी ४० लाख, आमदार निधीतील सन २०१५-१६ २ कोटी, आमदार निधीतील सन २०१४-२५ ची ५० लाख अशी एकूण मंजूर करण्यात आलेली ७५१ कोटी २२ लाख ९ हजार रूपये निधी झाल्याचे आमदार सुभाष भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्रस्तावित कामांमध्ये २७ गावातील पाणी प्रश्न सोडविणार असल्‍याचे सांगत १४ गावातील नळपाणी पुरवठा योजना राबविणार आहे, पडले येथे मिनी स्टेडीयम उभारणार आहे, एमआयडीसी विभागात पाण्याची टाकी, २७ गावातील मुख्य रस्ते करण्यावर भर, डोंबिवली शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे,दिवा व काटई येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन, कल्याणफाटा ते कळंबोली ८ पदरी महामार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न, तळोजा पर्यत आलेली मेट्रो दहिसर कल्याण फाटा मार्गे शिळ, दिवा, डोंबिवली कल्याण जोडणार, शिळफाटा- माणकोली उड्डाणपूल व महामार्ग, रिंगरुट ( बाह्यवळण महामार्ग ) तयार करणार, साबेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तावशीचा ( पडले ) रस्ता तयार करणार, खिडकाळी , शिळ, दावडी,निळजे, पिसवली, आडवली येथील तलावांचे शुभोभिकरण, मतदार संघात विविध ठिकाणी बसथांबे तयार करणे, शिळ येथे विद्युत उपकेंद्र सुरु करणे , २७ गाव आणि डोंबिवली शहरातील विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट, कल्याण ग्रामीण मतदारसंघात शासकीय विश्रामगृह आणि १४ गावे व २७ गावात सुसज्ज व्यायामशाळा उभारणार अशी माहिती आमदार भोईर यांनी दिली. येत्या १ एप्रिल रोजी आमदार सुभाष भोईर यांच्या मानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम मंत्री ) एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवा अधिकारी सुमित भोईर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

संघर्ष समितीचा संघर्ष फक्त कागदावर .....

२७ गावांची वेगळी नगरपालिका करण्यासाठी संघर्ष समिती प्रयत्न करत असताना दुसरीकडे या समितीचा संघर्ष कागदावरच असल्याची टीका शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश म्हात्रे यांनी केली. जर संघर्ष करायचा असेल तर या समितीने रस्त्यावर उतरायला हवे , आंदोलन आणि निदर्शने केली पाहिजे. मात्र यापैंकी काहीही होत नाही. २७ गावातील २१ नगरसेवकांनी राजीनामे द्यायला हवे. मात्र हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन २७ गावे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत असावी असे सांगत आहेत. 


  •