Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण : दुषित पाण्यामुळे लहान मुलांना उलट्या-जुलाब

कल्याण : दुषित पाण्यामुळे लहान मुलांना उलट्या-जुलाब

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कल्याण : वार्ताहर

डोंबिवली पश्चिमेकडील घनश्याम गुप्ते रोडवरील श्री गंगोत्री इमारतीत दोन दिवस दुषित पाणी पुरवठा होत आहे. याचा परिणाम लोकांच्या आरोग्‍यावर होत आहे. लहान मुलांना उलट्या- जुलाबाचा त्रास सुरू झाला आहे. या इमारतीतील साडे तीन वर्षांच्या लहान मुलीला  हा त्रास झाल्याने तिला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले तिच्यावर उपचार सुरू आहेत.

इमारतीतील पाण्याच्या टाकीच्या पाईपलाईन मध्ये गटाराचे पाणी आल्याने सर्वांच्या घरात गेली दोन दिवस दुषित पाणी आले होते. काही लहान मुलांनी हे दुषित पाणी पिल्याने त्यांना उलट्या- जुलाबाचा त्रास सुरू झाला. या इमारतीत राहणारे किशोरी कुवळेकर यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी त्यांची साडे तीन वर्षाची नात सनवी गुगरे राहण्यास आली होती. सनवीने दुषित पाणी पिल्याने तिला पूर्वेकडील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या इमारतीतील वेद करलेकर ( वय १२ ) यालाही जुलाब सुरू झाले आहेत. त्या इमारतीच्या आजुबाजूकडील दोन ते तीन इमारतीत दुषित पाणी आल्याने रहिवाशी वैतागले आहेत. या संदर्भात पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना विचारले असता ड्रेनेजचे चेंबर चॉकब झाले होते. चेंबरची लेवल वर आल्याने हे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये घुसले. उद्या एक दिवस खराब पाणी येईल. पालिकेने या इमारतीची नळजोडणी बंद केली असून काम पूर्ण झाल्यावर चांगले पाणी आल्यावर नळजोडणी  पूर्ववत करण्यात येईल. पालिका या इमारतीला दोन दिवस टॅकरने पाणीपुरवठा करेल असे त्‍यांनी सांगितले आहे.


  •