Sun, May 26, 2019 11:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण-डोंबिवलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात

कल्याण-डोंबिवलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात

Published On: Jan 26 2018 1:42PM | Last Updated: Jan 26 2018 1:42PMडोंबिवली : वार्ताहर

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय प्रजासत्‍ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन मोठया उत्‍साहात पार पाडला. महापालिका मुख्‍यालयात महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्‍त पी. वेलरासू यांची उपस्थित तर डोंबिवली येथे उपमहापौर मोरेश्‍वर भोईर आणि डोंबिवली विभागाचे उपायुक्‍त सुरेश पवार यांच्या उपस्थितीत ध्‍वजारोहण करण्‍यात आले. 

ध्‍वजारोहणानंतर केल्‍यानंतर महापौर राजेंद्र देवळेकर हे लोकशाही पंधरवाड्या निमित्‍त  लोकशाही, निवडणूक व सुशासन यावर त्यांनी मत व्‍यक्‍त करताना म्‍हणाले की, लोकशाही बळकट करण्‍यासाठी नागरिकांनी आवश्‍यक त्‍या सर्व विषयावर सतत शिक्षणाद्वारे जागरुक राहणे आवश्‍यक आहे. भारतीय घटनेने या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे  मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आरोग्‍य विभागातील अकरा सफाई कामगारांचा सत्‍कार करण्‍यात आला. स्‍वच्‍छ भारत अभियान स्‍वच्‍छता सर्वेक्षणातंर्गत शाळेच्‍या भिंती रंगविणाऱ्या ५६ शाळांपैकी १० शाळांनी उत्‍कृष्‍ठ भिंतीचित्र रंगविल्‍याबद्दल त्या शाळांचा गौरव करण्‍यात आला. या भिंत चित्रकला स्‍पर्धेसाठी चित्रकला शिक्षक अध्‍यापक संघ यांनी सहकार्य केले. भिंतीचित्र स्‍पर्धेमध्‍ये प्रथम पुरस्‍कार के. सी. गांधी हायस्‍कूल, कल्‍याण (प), द्वितीय पुरस्‍कार संवाद कर्णबधीर प्रबोधिनी शाळा (डोंबिवली-प), तृतीय पुरस्‍कार एनआरसी हायस्‍कूल, मराठी माध्‍यम, (मोहने), चतुर्थ पुरस्‍कार महात्‍मा गांधी विद्यालय (डोंबिवली-प), पाचवा पुरस्‍कार गणेश विद्यामंदिर (कल्‍याण-पूर्व) आणि उत्तेजनार्थ पुरस्‍कार शारदा विद्या मंदिर (कल्‍याण-प), स्‍वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय (डोंबिवली-प), बिर्ला स्‍कुल, (कल्‍याण-प), नवजीवन विद्यामंदिर, कल्‍याण(प), मोहिंदरसिंग काबुलसिंग हायस्‍कुल (कल्‍याण-प) या शाळांनी पटकावला. त्यानंतर डोंबिवली येथील कॅ. विनयकुमार सचान यांचे स्‍मारकास महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्‍त पी. वेलरासू यांनी पुष्‍पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उप महापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, आदी मान्यवर उपस्थित होते.