Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 25 कोटींच्या चेकची हरवलेली बॅग मिळाली

25 कोटींच्या चेकची हरवलेली बॅग मिळाली

Published On: Apr 07 2018 1:39AM | Last Updated: Apr 07 2018 12:22AMकल्याण : वार्ताहर

रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाची 25 कोटींचे चेक असलेली बॅग परत मिळाली असून या प्रवाशाने रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले आहेत.  कल्याणमध्ये राहणारे राजाराम मोरे हे एका खासगी एजन्सीमध्ये काम करतात. या एजन्सीद्वारे बँकेचे चेक गोळा केले जातात. काही दिवसांपूर्वी राजाराम यांनी त्यांच्या साथीदारासह कल्याणहून 12 वाजून 53 मिनिटांची मुंबईकडे जाणारी लोकल गाडी पकडली. राजाराम यांच्या टिमकडे एका बॅगेत 25 कोटींचे चेक होते. राजाराम दादर स्थानकात कामानिमित्त उतरले. त्यांच्या टिमचे अन्य सदस्य हे मुंबईकडे निघून गेले. काही तासानंतर एका बँकेतून फोन आला की एलआयसीचे चेक अद्याप प्राप्त झालेले नाही. 

राजाराम यांनी त्वरीत आपल्या टिमच्या साथीदारांना फोन करून विचारणा केली असता त्यांच्या सहकार्‍यांनी आमच्याकडे बॅगच नाही असे सांगितले. हे उत्तर ऐकून राजाराम यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कल्याण, डोंबिवली अशा प्रत्येक रेल्वे स्थानकात याबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना रेल्वे प्रशासनाकडून त्यांची बॅग ही दादर स्थानकातील  रेल्वे सुरक्षा बलाकडे असल्याचे समजले. रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी व बी. एन. यादव यांनी राजाराम यांना 25 कोटी रुपयांच्या चेकची बॅग परत करताच राजाराम यांचा जीव भांड्यात पडला. ही बॅग परत मिळाल्याने मोरे यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे व रेल्वे प्रशासनाने अभार मानले आहेत.
 

 

 

kalyan,Railway,safety, alert, 25 crores, check ,bag,passenger, Received,