Sun, Feb 17, 2019 19:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प : मुख्यमंत्री फडणवीस 

१३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्‍प : मुख्यमंत्री फडणवीस 

Published On: Jul 01 2018 5:06PM | Last Updated: Jul 01 2018 5:06PMकल्याण : वार्ताहर 

पाच वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून यंदाच्या वर्षी १३ कोटी वृक्ष लावण्याचा निर्धार असल्‍याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्‍हटले आहे. एक महिनाभर चालणार्‍या या वृक्ष लागवडीच्या मोहिमेच्या शेवटच्या दिवशी १३ कोटी पेक्षा जास्त वृक्ष  या मोहीमे अंतर्गत लागलेले असतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केला. या वेळी  देशातील सर्वात मोठी वृक्ष लागवडीची  मोहीम म्‍हणून  हा विक्रम महाराष्ट्राच्या नावाने कोरला जाईल असेही ते म्‍हणाले.

 १३ कोटी वृक्ष लागवडीच्या शुभारंभ प्रसंगी मुरबाड रोड वरप गाव येथील राधा स्वामी सत्संग आश्रमामागील वन विभागाच्या जागेवर झाला .यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रविंद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार नरेंद्र पवार सुप्रसिद्ध दिगदर्शक सुभाष घई, पतंजलीचे बालकृष्ण, सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, की वृक्षरोपणाचा कार्यक्रम केवळ कार्यक्रम नसून या सुष्टीला, विश्वाला वाचविण्याचा उपक्रम आहे .ज्या प्रकारे वनांची कत्तल, जलाशयांचा नाशासह जमिनीचा ऱ्हास केलेला पाहिल्यास अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे.

वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी ढासळत्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याची संकल्पना मांडली. ते म्हणाले भारताच्या इतिहासातील नवीन विक्रम करणारा दिवस आहे. २०१६ मध्ये २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे ठेऊन मैदानात उतरलो त्यावेळी पावणे तीन कोटी वृक्ष लागले ,गेल्यावर्षी  ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टे ठेऊन मैदानात उतरलो त्यावेळी ५ कोटीपेक्षा अधिक वृक्ष लागले, यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र मैदानात उतरला आहे.