Sat, Nov 17, 2018 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावीची तिसरी यादी पुढे जाणार

अकरावीची तिसरी यादी पुढे जाणार

Published On: Jul 25 2018 8:38PM | Last Updated: Jul 25 2018 8:38PMमुंबई : प्रतिनिधी

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी यादी पुढे ढकलणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पसंख्याक महाविद्यालयातील इनहाउस कोट्यातील जागा पुन्हा सरेंडर करण्याच्या निर्णय दिल्याने तिसरी यादी पुढे ढकलली जाणार आहे. यासंदर्भातील सुधारित वेळापत्रक गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

अल्पसंख्याक कोट्यातील इनहाउस कोट्यातील जागा सरेंडर करण्यासाठी दोन दिवस महाविद्यालयांना लिंक देणार आणि परत विद्यार्थ्यांना दोन दिवस पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे चार ते पाच दिवस अकरावीची यादी पुढे ढकलली जाईल अशी शक्यताही शालेय शिक्षण विभागातील एका वरीष्ठ अधिकार्‍याने सांगितले.