Wed, Jan 23, 2019 08:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्रकार जे डे हत्या प्रकरणी आज अंतिम सुनावणी

पत्रकार जे डे हत्या प्रकरणी आज अंतिम सुनावणी

Published On: May 02 2018 9:07AM | Last Updated: May 02 2018 9:07AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी आज अंतिम सुनावणी होणार आहे. या प्रकरणी विशेष मोक्का न्यायालय आज (२ मे) १४ आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. त्यामुळे अंडरवर्ल्ड गँगस्टर राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन आणि तत्कालीन पत्रकार जिग्ना वोरा यांच्यासह अन्य आरोपी या प्रकरणात दोषी ठरणार का? आणि दोषी ठरले तर त्‍यांना कोणती शिक्षा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

छोटा राजन आणि  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यातील गँगवारच्या वादातून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. जे डेही याच वादाचा बळी ठरले होते. ११ जून २०११ रोजी जे. डे यांची त्यांच्या पवई येथील निवासस्थानाजवळ भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 

जे. डे हे एका इंग्रजी सायंदैनिकाचे संपादक होते. तर, जिग्ना वोरा ही एका इंग्रजी दैनिकात वरिष्ठ पदावर होती. पत्रकारितेतील स्पर्धेतून जिग्नाने जे. डे यांना संपवण्यासाठी छोटा राजनला चिथावले, असा आरोप तिच्यावर आहे. तिच्या विरोधातही पुरावे निष्पन्न झाले आहेत. त्‍यामुळे तिलाही या हत्‍येप्रकरणी शिक्षा होण्याची शक्‍यता आहे. 

Tags : journalist, j dey,  murder,  case