Tue, Jul 16, 2019 00:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांचे निधन

Published On: Feb 13 2018 11:04PM | Last Updated: Feb 13 2018 11:04PMमुंबई : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि लेखक मुझफ्फर हुसेन यांचे आज सायंकाळी पवईच्या हिरानंदानी (वय, ७८)रुग्णालयात निधन झाले. 

महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रातील प्रसिद्ध आणि प्रख्यात लेखक, विचारवंत म्हणून मुझफ्फर हुसेन परिचित होते. त्यांना महाराष्ट्र शासनासह, केंद्र शासनाचेही अनेक पुरस्कार मिळाले होते. २००२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.