Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जोगेश्वरी भूखंड घोटाळा; ४ अधिकारी निलंबित, १८ जणांवर ठपका

जोगेश्वरी भूखंड घोटाळा; ४ अधिकारी निलंबित, १८ जणांवर ठपका

Published On: Aug 21 2018 12:06PM | Last Updated: Aug 21 2018 12:06PMमुंबई  : प्रतिनिधी 

जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई महापालिकेच्या ४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर १८ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी  कार्यकारी अभियंता अशोक शेंगडे,सहाय्यक अभियंता विजयकुमार वाघ, दुय्यम अभियंता गणेश बापट आणि उप कायदा अधिकारी पी. व्ही. नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जोगेश्वरी येथील बांद्रेकरवाडी परिसरात रुग्णालय, मनोरंजन मैदान आणि रस्त्यासाठी साडेतीन एकर भूकंड आरक्षित टेवण्यात आला होता. मात्र, पालिकेच्या विधी आणि विकास नियोजन खात्यातील लोकांच्या हलगर्जीपणाने तब्बल ५०० कोटी रुपयांचा भूखंड गमावावा लागला होता.

आयुक्तांच्या सहीमध्ये खाडाखोड करुन भूखंड मालकाला मदत केल्याचा ठपका ठेवत महापालिकेतील चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर १८ जणांवर भूखंड घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.