Wed, Jun 26, 2019 03:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप प्रवक्तीनं मुंबईकरांची माफी मागावी : जितेंद्र आव्हाड(व्हिडिओ)

भाजप प्रवक्तीनं मुंबईकरांची माफी मागावी : जितेंद्र आव्हाड(व्हिडिओ)

Published On: Mar 15 2019 9:20AM | Last Updated: Mar 15 2019 10:16AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्टेशनलगत डी. एन. रोडवरून जाणार्‍या जुन्या पादचारी पुलाचा स्लॅब गुरुवारी रात्री 7.30 वाजता अचानक कोसळून ६ जण ठार तर, 34 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्‍त होत असतानाच भाजपच्या प्रवक्‍त्या संजू वर्मा यांनी या घटनेला पादचारीच जबाबदार असल्‍याचे वक्‍तव्य केलेल्‍याने त्‍यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्‍या ट्विटर अकाउंटवरुन शर्मा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

‘‘सीएसएमटी जवळचा पादचारी पुल कोसळण्याच्या घटनेला पादचारी जबाबदार आहेत, असे धक्कादायक वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्या संजू वर्मा हीनं मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

‘‘मुंबईत ब्रीज पडला जबाबदारी कोणाची?, ब्रीजचे ऑडीट केले होते ? दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्वरीत २५ लाख रुपयांची मदत करा. भाजपचे प्रवक्ते म्हणाले की, ब्रीज पडण्याची जबाबदारी पादचाऱ्यांवरच आहे. त्‍या  प्रवक्त्यांनी आणि भाजपने मुंबईकरांची माफी मागावी. तसेच रेल्‍वे मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा’’ असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.