Fri, Nov 16, 2018 17:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत दोन ज्युनियर डॉक्टरांना मारहाण (video)

मुंबईत दोन ज्युनियर डॉक्टरांना मारहाण (video)

Published On: May 19 2018 2:07PM | Last Updated: May 19 2018 2:10PMमुंबई : प्रतिनिधी

डॉक्टरांवर वाढणारे हल्ले थांबता थांबत नाहीत. मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. ताजी घटना मुंबईच्या सर जे. जे.  रुग्णालयात घडली.

सर जे. जे रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ११ या सर्जरी वॉर्डमध्ये सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून ज्युनियर मारहाण करण्यात आली तर रुग्णालयाची तोडफोडही करण्यात आली.

 मुंबईच्या सर जे.जे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर म्हणाले, “शनिवारी सकाळी सात वाचण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन ज्युनियर निवासी डॉक्टरांना नातेवाईकांनी मारहाण केली आणि रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना दु:खद असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.