आयपीएल चाहत्यांसाठी सुखद बातमी!

Last Updated: May 21 2020 11:29AM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


मुंबई : पुढारी ऑनलाईन

जगभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. देशातील सर्वच क्षेत्राला कोरोनाचा फटका बसला आहे. बीसीसीआयने सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. २९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धा सुरु होणार होती पण ती रद्द करण्यात आली आहे. आयपीएल २०२० चे आयोजन रद्द झाल्यास ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल जोहरी यांनी आयपीएल बद्दल एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 

वाचा :'तर मी देशासाठी बंदूक उचलायला तयार'

गेल्यावर्षी देशभरात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जेवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापेक्षा जास्त लोकांनी आयपीएलचा आस्वाद घेतला. प्रायोजकांसाठी क्रिकेट हाच नेता आहे आणि तोच त्यांना मार्ग दाखवतो. इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा क्रिकेटमुळे जनजीवन सुरळीत होण्यास लवकर मदत होईल. कोरोनातून जगाला आणि देशाला सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल यात वाद नाही. ही एका दिवसात होणारी प्रक्रीया नक्कीच नाही”, असे जोहरी यांनी टीसीएम स्पोर्ट्स हडल वेबिनारमध्ये नमूद केले.

जेव्हा विमानसेवा सुरू होईल तेव्हा, स्पर्धा सुरू होण्याआधी प्रत्येकाला स्वत:ला क्वारंटाईन करावे लागेल. प्रत्येक खेळाडूचे वेळापत्रक कसे आहे, याबाबत माहिती घेऊनच त्यावर विचार करण्यात येईल. आम्ही सारे खूप आशावादी आहोत. आम्ही आशा करतो की पावसाळा संपेपर्यंत परिस्थिती सुधारली असेल. म्हणून आम्ही पावसाळ्यानंतर आयपीएल आयोजनाचा विचार करत आहोत”, अशी माहिती जोहरी यांनी दिली.

कोणत्याही परिस्थीतीत आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. २५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन करण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.  

वाचा :बासीसीआयची तुर्तास खेळाडूंच्या मानधनाला कात्री नाही