Wed, Jul 24, 2019 12:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिक्षा चालकांची मुजोरी : प्रवाशाला घरात घुसून मारहाण

रिक्षा चालकांची मुजोरी : प्रवाशाला घरात घुसून मारहाण

Published On: Mar 08 2018 4:16PM | Last Updated: Mar 08 2018 4:01PMकल्याण : वार्ताहर

भाड्यावरून वाद घालत मुजोर रिक्षा चालकांनी एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकानजीक स्टँडवर घडली. हे मुजोर रिक्षा चालक इथेच थांबले नाहीत तर त्यांनी या प्रवाशाचा पाठलाग करत त्याचे घर गाठले त्याच्या घरावर दगडफेक करत त्याच्यासह त्याच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारीनुसार पोलिसानी सद्दाम शेख, मोहम्मद मुनावर अली खान, मोहन, जावेद खान, व अन्य एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पुर्वेकडील कचोरे पत्रिपुल परिसरात राहणारे रिंकू तिवारी आपल्या नातवाईकांसह मंगळवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ट्रेनने आपल्या गावावरून परतले. ते कल्याण रेल्वे स्टेशनला उतरल्या नंतर त्यांनी रिक्षा पकडण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा स्टँड गाठले. त्यावेळी सद्दाम नावाच्या रिक्षा चालकाला त्यांनी पत्रिपुलला जाण्यासाठी भाडे विचारले असता त्याने ६०  रुपये सांगितले मात्र रिंकू याने ५०  रुपये सांगताच या दोघा मध्ये वाद झाला. या वादातून सद्दाम, साकीब व त्याचा साथीदार मोइन यांनी रिंकू याना मारहाण केली. त्यानंतर रिंकु यांनी दुसरी रिक्षा करत घर गाठले व सद्दाम ,साकीब व त्याचा साथीदार मोइन यांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत रिंकू व त्याच्या नातवाईकांना  मारहाण केली.या हल्ल्यात रिंकूसह त्याचे नातेवाईक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .तर या प्रकरणी रिंकू यांनी काल महात्मा फुले पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून यानुसार पोलिसांनि सद्दाम शेख, मोहम्मद मुनावर अली खान, मोहन, जावेद खान, व अन्य एका साथीदारा विरोधात गुन्हा दाखल केला आहे .