Thu, Apr 18, 2019 16:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद 

राज्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद 

Published On: Aug 09 2018 9:13AM | Last Updated: Aug 09 2018 9:16AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभरातील बंदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. मागील काही घटनांमध्ये अफवा पसरण्यामध्ये सोशल मीडियामधील फेक न्यूज कारणीभूत ठरल्या आहेत. त्यामुळे राज्यभरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.  

वाचा : महाराष्‍ट्र बंद Live अपडेट; बंद सुरू; राज्यभर कडक पोलिस बंदोबस्‍त

आजच्या बंदमध्ये नाशिक, ठाणे व नवी मुंबईचा समावेश नसल्याची माहिती मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाकडून बंद शांततेत पार पाडावा यासाठी विविध स्तरातून आवाहन करण्यात येत आहे.