Tue, Apr 23, 2019 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › फिजिक्स ऑलिंपियाड: भारताकडून सुवर्ण पदकांची लयलुट!

भौतिकशास्त्रात भारताने रचला नवा इतिहास!

Published On: Jul 30 2018 11:21AM | Last Updated: Jul 30 2018 11:21AMमुंबई: पुढारी ऑनलाईन

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड २०१८मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी नवा इतिहास रचला. स्पर्धेत सहभागी झालेल्या देशाच्या संघातील सर्व ५ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकण्याची गेल्या २१ वर्षातील ही पहिलीच घटना आहे. भारताचे हे स्पर्धेतील आजवरचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. 

स्पर्धेत भारताकडून भास्कर गुप्ता (मुंबई), लय जैन (कोटा), निशांत अभांगी (राजकोट), पवन गोयल (जयपूर) आणि सिद्धार्थ तिवारी (कोलकाता) यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धेत जगभरातील ३९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४२ जणांना सुवर्णपदक जिंकता आले.  

ऑलिंपियाडमध्ये भारताच्या संघाने सर्वोत्तम अशी कामगिरी केली. भारत या स्पर्धेत १९९८पासून सहभागी होत आहे. पण संघातील प्रत्येक खेळाडूने सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी भारताने ३ वेळा ४ सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले होते, असे नॅशनल सेंटर होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमधील अधिकारी प्रविण पाठक यांनी सांगितले. 

पोर्तुगलमधील लिस्बन येथे झालेल्या ४९व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये ८९ देशांनी सहभाग घेता होता. भारत वगळता केवळ चीनच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक जिंकता आले.