Wed, Nov 14, 2018 02:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत !

चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत !

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

हुतात्मा स्मारकावर कायम तेवत असलेल्या ज्योतीच्या धर्तीवरच चैत्यभूमीवरही अशीच भीमज्योत उभारण्यास सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मान्यता दिली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत असावी, अशी मागणी आ. कालिदास कोळंबकर यांनी बडोले यांच्याकडे  केली होती. त्यानुसार, बुधवारी सकाळी 11.00 वाजता बडोले भीमज्योत उभारण्याच्या जागेची पाहणी करणार असून यावेळी आ.कोळंबकर, प्रधान सचिव (नगर विकास), प्रधान सचिव (पर्यावरण), सचिव(सामाजिक न्याय), महापालिका उपायुक्त उपस्थित राहणार आहेत.