मुंबई : पुढारी ऑनलाईन
भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती तीन टायर पंक्चर झाल्यासारखी झाल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिंदबरम यांनी केली. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि महागाईवरही त्यांनी मोदी सरकारला धारेधर धरले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
खासगी क्षेत्रातील गुंतवणूक, खासगी उपभोग, निर्यात आणि सरकारकडून केला जाणारा खर्च हे कोणत्याही अर्थव्यवस्थेची चार महत्त्वाची चाके आहेत. यापैकी एक किंवा दोन चाके पंक्चर झाले तरी अर्थव्यस्थेची गाडी कोलमडते. पण, आपल्याकडे तर या गाडीची तीन चाके पंक्चर आहेत, असे ते म्हणाले. देशात सरकार फक्त आरोग्य आणि काहीच योजनांवर खर्च करत आहे, असेही ते म्हणाले.
हा खर्च करता यावा यासाठी पेट्रोल-डिझेल आणि गॅसवरील कर लावणे मोदी सरकारने सुरूच ठेवले आहे. कर वसुलीच्या नावाखाली सरकार लोकांकडून पैसे उकळत आहे. यापैकी थोड्याच पैशांचा वापर लोकांना सेवा देण्यासाठी केला जात आहे, असेही माजी केंद्रीय अर्थमंत्री म्हणाले.
गेल्या काही दिवसात तुम्ही वीज क्षेत्रात सरकारने कोणती गुंतवणूक केल्याचे ऐकले आहे का? असा सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केला. तर कर व्यवस्थेच्या (जीएसटी) पाच टप्प्यांवरूनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केला.
l