Thu, Jan 24, 2019 07:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अब तक ३६,०००!

अब तक ३६,०००!

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 23 2018 8:24PMमुंबई : वृत्तसंस्था 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या आर्थिक विकास दरात सुधारणा होईल, असे भाकीत केल्यानंतर मंगळवारी शेअर बाजारात खरेदीचा उत्साह कायम राहिला आणि निर्देशांकाने पहिल्यांदाच 36,000 ची विक्रमी पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 11 हजारांची विक्रमी पातळी पहिल्यांदाच गाठली.  मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू होताच एकाच मिनिटात निफ्टीने विक्रमी टप्पा गाठला.

पाठोपाठ निर्देशांकानेही 36 हजार पार केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, माहिती-तंत्रज्ञान आणि औषध  उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमुळे निर्देशांकाने ऐतिहासिक टप्पा पार केला. निर्देशांक 341.97 अंशांच्या वाढीसह 36,129 वर, तर निफ्टी 117.50 अंशांच्या वाढीसह 11,083.70 वर बंद झाला. फक्‍त सहा दिवसांत निर्देशांकाने 35 ते 36 हजारांचा टप्पा पार केला आहे.