Wed, Jul 24, 2019 08:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावी विज्ञान पुस्तकात आकृत्यांमध्ये चुका

दहावी विज्ञान पुस्तकात आकृत्यांमध्ये चुका

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमातील विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 पुस्तकातील आकृत्या चुकीच्या असून त्या आकृत्या आहेत की, विविध रंगांचे आकार हेच कळत नाही, अशी टीका होत आहे.

दहावीची पुस्तके यंदा बदलली आहेत. अनेक विषयांतील चुका समोर येत असताना आता विज्ञान पुस्तकातील चुका समोर आल्या आहेत. पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 72 - डोलिओलम, अ‍ॅम्फिऑक्सस या सागर निवासी प्राण्यांची प्रतिकृती, पृष्ठ क्रमांक 18 - गुणसुत्रे, पृष्ठ क्रमांक 13  मानवी श्वसनसंस्था, पृष्ठ क्रमांक 68 आंघोळीचा स्पंज, पृष्ठ क्रमांक 23 - द्विविभाजन अशा विविध चुका आहेत. यांसह तब्बल 40 आकृत्या चुकीच्या असल्याचे शिक्षणतज्ज्ञ नरेंद्र तांबोळी यांनी म्हटले आहे. 

पुस्तकात अनेक ठिकाणी आकृत्यांचे आकार चुकीचे असून काही ठिकाणी तर आकृत्यांऐवजी विविध रंगांच्या छटा दिसत असल्याचे तांबोळी यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी 2008 सालीदेखील विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात चुकीच्या आकृत्या छापण्यात आल्या होत्या. त्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही, अशी कबुली शिक्षण मंडळाने दिली होती. मात्र आता पुन्हा त्याच चुका झाल्याचे तांबोळी यांनी म्हटले आहे.