Mon, May 20, 2019 22:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गावठाणावरील अतिक्रमीत घरे नियमित होणार

गावठाणावरील अतिक्रमीत घरे नियमित होणार

Published On: Dec 23 2017 7:07PM | Last Updated: Dec 23 2017 7:03PM

बुकमार्क करा

मालेगाव : पुढारी ऑनलाईन

राज्यात ग्रामीण भागातील गावठाण, सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेली घरे नियमित होणार आहेत. तसा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून, त्याला कॅबिनेटची मंजुरीही मिळाली आहे. येत्या १५ दिवसांत सरकारी आदेश निघणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. 

येत्या पंधरवाड्यात अतिक्रमण केलेल्या जागेतील घरे नियमित करण्याबाबत सरकारी आदेश काढण्यात येणार आहे. त्यानंतर घरांचा सातबारा घर मालकांच्या नावावर होईल, असेही राज्यमंत्री भुसे यांनी या वेळी सांगितले.

ग्रामीण भागात गावामध्ये जागा अपुरी पडू लागल्यानंतर अनेकांनी अतिक्रमण करून गावठाण, सरकारी जागेत घरे बांधली आहेत. ही घरे नियमित करावीत, अशी मागणी काही काळापासून गावकर्‍यांकडून सुरू होती. अखेर सरकारने हा निर्णय घेतल्याने गावठाण व सरकारी जमिनीवरील घरे आता नियमित होणार आहेत.