Tue, Apr 23, 2019 10:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात

कमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात

Published On: Dec 29 2017 3:05PM | Last Updated: Dec 29 2017 3:12PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी 

कमला मिलमधील वन अबोव या कलबमधील अनधिकृत बांधकामाने १५ जणांचा जीव घेतला आहे. या क्लबने मोकळया जागेचा अनाधिकृत वापर केला होता. त्यामुळे पालिकेने नोटीस बजावून या बांधकामावर कारवाई केली होती. पण, पालिकेची पाठ फिरताच पुन्हा अनधिकृत बांधकाम  उभारण्यात आले. 

कमला मिलमधील वन अबोव या क्लब मधील आगीच्या दुर्घटनेनंतर या भागातील सर्वच कार्यालयाची तपासणी करण्यात येईल. यामध्ये ज्यांचे अनधिकृत आणि वाढीव तसेच नियमबाह्य बांधकाम झाल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे  जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले.

 दरम्यान  वन अबोव या क्लबकडे हॉटेलचा परवाना आहे. परंतु आग लागली त्या मोकळ्या जागेचा ते अनधिकृत वापर करत होते. त्यामुळे २७ मे २०१७ मध्ये  या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या जागेचा वापर त्यांच्याकडून सुरू होता. त्यामुळे ४ ऑगस्ट, २२ सप्टेंबर व २७ ऑक्टोबर मध्ये नोटीस देऊन या मोकळ्या जागेचा वापर बंद करण्यात यावा, असे कळवण्यात आले होते. असे सपकाळे यांनी स्पष्ट केले.

संबधित वृत्त :

कमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात

कमला मिल दुर्घटनेची CBI चौकशी करा: विखे-पाटील

मुंबई : कमला मिल अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू(व्हिडिओ)

कमला मिल्स आग : आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली

12 वाजता केक कापला, साडेबारा वाजता अंत झाला 

कमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट

कमला मिल आग:  पब मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा