Tue, May 21, 2019 12:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › द्रुतगतीवर भीषण अपघात मुंबईचे ४ ठार

द्रुतगतीवर भीषण अपघात मुंबईचे ४ ठार

Published On: May 10 2018 1:59AM | Last Updated: May 10 2018 1:49AMकामशेत :  वार्ताहर 

भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात चौघांचा  मृत्यू झाला. तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि.9)  दुपारी तीनच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ हा भीषण अपघात झाला.  

निखिल राव, सिध्देश बेडे, नितीन जनवाल, रुपेश जाधव (सर्व. रा. मुंबई)  असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.  तर अक्षय चव्हाण, वैभवी सुद्रीक, जयश्री राठोड व अन्य एक अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इर्टिगा ही कार (एम एच 03 / सी बी 8684) दुपारी तीनच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून जात होती. भरधाव कार  कामशेत बोगद्याजवळ आली असता कारचे टायर फुटल्याने  चालकाचे  गाडीवरील नियंत्रण  सुटून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर आदळली. कारमध्ये एकूण आठ प्रवासी होते. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला.