होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्राध्यापक भरती बंदीविरोधात मुंबईत आंदोलन; आमदारांचा पाठिंबा

प्राध्यापक भरती बंदीविरोधात मुंबईत आंदोलन; आमदारांचा पाठिंबा

Published On: May 15 2018 10:36AM | Last Updated: May 15 2018 3:03PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सहाय्‍यक प्राध्यापक पदांच्या भरतीवरील बंदी उठवावी अशी मागणी गेल्या काही काळापासून सेट, नेट, पीएचडी पात्रता धारकांकडून होत आहे. याच मागणीसाठी आज (दि.१५) पात्रताधारकांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. ६०० हून अधिक पात्रताधारकांचे शिष्‍टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देणार आहेत. 

प्राध्यापक पदांवरील भरती बंदी लवकरात लवकर उठवावी. मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्‍वरीत निर्णय घ्यावा अन्यथा आम्‍हाला आत्‍महत्येची परवानगी द्यावी, अशी मागणी करत पात्रताधारकांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्‍थळी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे आणि विक्रम काळे यांनी भेट दिली. तसेच आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्‍त केला. 
 

अपडेट : 

पात्रताधारक आंदोलकांच्या मागण्या

Image may contain: text

मुख्यमंत्र्यांना निवेदन

No automatic alt text available.

No automatic alt text available.

शिक्षक आमदार विक्रम काळे यांची आंदोलन स्‍थळास भेट आणि आंदोलनास पाठिंबा

पुणे व अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत आणि श्रीकांत देशपांडे यांचा आंदोलनास पाठिंबा