Tue, Nov 13, 2018 21:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी अनोखा प्रयोग

ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी ‘हॉर्न व्रत’

Published On: Apr 06 2018 5:15PM | Last Updated: Apr 06 2018 5:13PMमुबंई : पुढारी ऑनलाईन

सध्या प्रदुषण रोखण्याच्या संदर्भात अनेक चर्चा होत असतात. प्रदुषण ही गोष्ट जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे. यावर उपाय करण्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. पर्यावरणसंदर्भात जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी सुचना फलक लावले जातात, व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. अनेक सामाजिक, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था सतत वेवेगळे प्रयोग करुन प्रदुषण कमी करण्याचे आवाहन करतअसतात. महाराष्ट्रामधील आवाज फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्र परिवहन विभाग, रिक्षा संघटनांनी मिळुन ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी एक नवा प्रयोग केला आहे. 

ध्वनी प्रदुषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे रस्त्यावरीन वाहनांचे हॉर्न. हे असे प्रदुषण थांबवण्यासाठी महाराष्ट्रात एक अनोखे अभियान राबवण्यात आले आहे. या अभियनातंर्गत सर्व रिक्षा संघटना मिळुन हॉर्न न वाजवण्याची विनंती करत आहेत. या अभियनाला त्यांनी 'हॉर्न व्रत' असे नाव दिले आहे. 

हॉर्न व्रताची सुरूवात २७ जानेवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणावरून करण्यात आली. हॉर्न व्रताचा अर्थ असा आहे की, हॉर्न वाजवण्यापासुन लांब रहा. हॉर्न व्रत अभियान मध्ये, आवाज फौंडेशनने  रिक्षांच्या संपूर्ण बॉडीवर हॉर्न बसवण्यात आले आहेत तसेच या रिक्षांसोबत रिक्षाचालक हॉर्न वाजवू नका अशा सुचना देत आहेत. 

एएनआय वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार,  रिक्षा संघटनेतील एका व्यक्तीने म्हटले आहे की, हॉर्न वाजवल्यामुळे ध्वनि प्रदुषण होतेच, पण त्यासोबत मानवाची चिडखोर वृत्तीत भर पडते. तसेच त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. या हॉर्न व्रतामुळे ध्वनीप्रदुषण कमी होण्यासा मदत होईल. 

Tags : mumbai, hornvrat,  Campaign, auto