Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कारची कंटेनरला धडक, दोघांचा मृत्यू

मुंबईत कारची कंटेनरला धडक, दोघांचा मृत्यू

Published On: Jun 30 2018 9:36AM | Last Updated: Jun 30 2018 9:35AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील भांडुप उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने कंटेरला पाठिमागून जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, यात दोघांचा जागीच मृत्‍यू झाला तर  तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महेश (वय, २१) आणि चिकू (वय, २२) अशी या अपघातात मृत्‍यू झालेल्‍यांची नावे आहेत तर हेमंत शिवगुंडे (वय, २१), अक्षय मोरे  (वय, २२), आणि निहार कोडे  अशी जखमी झालेल्‍यांची नावे आहेत. 

भांडुप फ्लायओव्हरवर सकाळी 6:30 वाजता हा अपघात झाला. अपघातग्रस्‍त कार भांडुपहून ठाण्याला निघाली होती. यावेळी कारवरील चालकाने नियंत्रण सुटल्‍याने कार दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला जात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडकली. यात कारमधील दोघांचा मृत्‍यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले.