Mon, Aug 19, 2019 11:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  होळी : मुंबईत नीरव मोदीच्या पुतळ्याचे दहन

 होळी : मुंबईत नीरव मोदीच्या पुतळ्याचे दहन

Published On: Mar 02 2018 9:02AM | Last Updated: Mar 02 2018 9:01AM मुंबई : पुढारी ऑनलाईन

देशासह राज्‍यभरात होळीचा सण धुमधडाक्‍यात साजरा होत आहे. आज धूळवडीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा  दिल्‍या आहेत. होळीचा सण उत्‍साहात आणि आनंदात जावो, असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे. अयोध्येत मौलवी आणि पुजाऱ्यांनी एकत्रितपणे होळी साजरी करत एकोप्याचा संदेश दिला.  मुंबईकरांनी नीरव मोदीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन होळी साजरी केली.

देशवासियांनी होळीच्या उत्‍साहाबरोबरच आपल्‍या समस्‍यां होळीत दहन केल्‍या. पंजाब नॅशल बँकेला कोट्यवधीचा गंडा घालून परदेशी पळालेल्‍या नीरव मोदीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं मुंबईतील वरळीमध्ये दहन करण्यात आले. याठिकाणी नीरव मोदीचा ५८ फुट उंचीचा पुतळा उभारण्यात आला होता. राज्यातील औरंगाबादमध्ये सुरु असलेल्या कचराप्रश्नावरही नारेगावच्या ग्रामस्थांनी कचऱ्याची होळी पेटवून प्रशासन आणि महापालिकेच्या नावाने शिमगा केला.