Fri, Jul 19, 2019 15:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हिरे कुटुंबियांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

हिरे कुटुंबियांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Published On: Dec 07 2018 2:11PM | Last Updated: Dec 07 2018 2:11PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

नाशिक जिल्ह्यातील अपुर्व हिरे, अद्वेत हिरे आणि प्रशांत हिरे यांनी शुक्रवारी (दि. ०७ रोजी) राष्टृवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्टृवादीचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी, राष्ट्रवादीत येण्यासाठी अनेक नेते उत्सुक असल्याचे सांगितले. येणा-या काळात असे प्रवेश होत राहतील, असा दावाही त्यांनी केला.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले, मध्यंतरीच्या काळात काही गैरसमज निर्माण झाले होते. तो दुरावा मिटला आहे. नाशिकच्या राजकारणात हिरे कुटुंबियांना योग्य ते स्थान दिले जाईल, असे भुजबळ म्हणाले. तर शरद पवार यांनी हिरे कुटुंबियांचा भाजप प्रवेश हा अपघात होता, अशी मिश्किली केली. अपघातातून सावरून ही गाडी आता योग्य मार्गावर आली आहे. असे ते म्हणाले. 

यावेळी पवार यांनी सरकारच्या धोरणांचा फटका कांदा उत्पादकांना बसत असल्याची टीका केली. ज्यांनी नाशिक दत्तक घेतो म्हणून सांगितले त्यांनीच याकडे दुर्लक्ष केले. त्यांचे दत्तकविधान न टिकणारे होते. दत्तक बापावर नाशिक जिल्हा चालणारा नाही तर शेतकरी बापावर चालणारा आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.