Tue, Apr 23, 2019 09:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रक्षाबंधनानिमित्त हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे दर्शन

रक्षाबंधनानिमित्त हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे दर्शन

Published On: Aug 26 2018 12:29PM | Last Updated: Aug 26 2018 12:29PMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण जवळच्या मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून सामाजिक एकतेच दर्शन घडविले आहे. कल्याणपासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर असलेल्या मलंगगडावर हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. मलंगगडावर असलेला हिंदू व मुस्लिम धर्मातील तिढा न्यायालयात आहे. मात्र हे सर्व विसरून हिंदू-मुस्लिम भाविकांनी सामाजिक आणि धार्मिक एकोपा जोपासला आहे.

एकीकडे दोन्ही धर्मीयांकडून एकतेच दर्शन घडवल्याने दोन्ही समाजामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील भाविकांनी मध्यरात्री गडावर जाऊन नारळी भात आणि नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली. याच वेळी रक्षाबंधनसुद्धा साजरा करण्यात आला. 

बहीण-भावाच्या अतूट नात्याची साक्ष देणारा रक्षाबंधन हा सण आणि याच दिवशी या हिंदू-मुस्लिम बांधवांनी एका नव्या नात्याची आठवण सगळ्यांना करून दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्यासोबत आहेत हे जाणवून देणारा हा दिवस मानला जातो. बहीण भावाच्या हाताला राखी बांधते आणि भाऊ  आयुष्यभर तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. एकमेकांवरचा विश्वास, प्रेम हे सगळे या राखीच्या धाग्यात गुंफलेले असते. हिंदू-मुस्लिम एकोप्याचे यथार्थ दर्शन रक्षाबंधनानिमित्त दिसून आले.