Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-नाशिकमध्ये दमदार पाऊस 

मुंबई-नाशिकमध्ये दमदार पाऊस

Published On: Jun 17 2018 10:47AM | Last Updated: Jun 17 2018 11:02AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

गेल्‍या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. नाशिकमध्येही पावासानेच पहाटेपासून चांगलाच जोर धरला आहे. रविवार आणि सोमवार मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, 

मुंबईतील लोअर परळ, वरळी, दादर आदी भागात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच उपनगरातील अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडूप येथेही पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, वसई  आणि विरार या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळी आहे. या घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे.  

नाशिकसह परिसरात रविवारी पाहटेपासून पावाचा जोर वाढला आहे. यामुळे तेथील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे.