Sat, May 30, 2020 04:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › #MumbaiRain : ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा; मुंब्रा बायपास खचला

#MumbaiRain : ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा; मुंब्रा बायपास खचला

Published On: Jul 11 2018 8:03AM | Last Updated: Jul 11 2018 10:08AMठाणे : पुढारी ऑनलाईन

येत्या 48 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घरीच थांबण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी केले आहे. अत्यंत गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे प्रशासनाने म्हटले आहे. पावासामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून त्यामूळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे भाईंदर ते विरार पश्चिम रेल्वे सेवा बंद झाली आहेत. अनेक एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या असून मध्य , हार्बर रेल्वे मार्गावर लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

मुंब्रा बायपास खचला

ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील मुंब्रा बायपास रस्ता मुसळधार पावसामुळे खचला आहे. काल रात्री डोंगर परिसरातील रस्ता खचल्याने मोठ्या भेगा पडल्या आहेत. या रस्त्यावरील रेतीबंदर पुलाचे काम सुरु असल्याने काही दिवसांपासून वाहतूक बंद असल्याने धोका टळला.

मुंब्रा बायपास खचल्यामुळे डोंगर परिसरातील रस्त्याची माती खाली सरकल्यास तेथील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. रस्ता खचल्याचे समजताच बांधकाम विभागासह पोलीस प्रशासन आणि आपत्ती कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

काल पासून उमरोली रेल्वे स्थानकामध्ये गाड्या न थांबविल्याने स्थानिक प्रवाशांनी रेल रोको केला.यावेळी वैतरणा डहाणू रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या महेश पाटील यांनी केली मध्यस्थी करत लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.

Live Updates :

मुंबई : कल्याणजवळ गोदावरी एक्सप्रेसचे इंजिन फेल; मुंबईला येणाऱ्या लोकलचा खोळंबा

पालघर- उमरोळी स्थानकात प्रवाशांचे रेल रोको, विवेक एक्स्प्रेसला थांबा न दिल्याने प्रवासी संतप्त; वांद्रे-गाजीपूर एक्स्प्रेस रोखली 

मुंबई: मालाडमध्ये पुष्पा पार्कजवळ मेट्रोची क्रेन बंद पडल्याने वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी 

मुंबई : नालासोपारा स्थानकांवरील पाणी अद्याप न ओसरल्याने गाड्यांच्या अप-डाऊन मार्गावर गाड्या चालवण्यास अडथळा : रेल्वे प्रशासन

पालघर : पश्चिम उपनगरीय रेल्वे रखडली; 24 तासांपासून रेल्वे प्रवासी डहाणू, बोईसर स्थानकांत अडकले