Mon, Nov 19, 2018 12:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हृदयाचा 94 मिनिटात 323 किमी प्रवास

हृदयाचा 94 मिनिटात 323 किमी प्रवास

Published On: Jun 25 2018 1:50AM | Last Updated: Jun 25 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

चार वर्षांच्या मुलीसाठी एका हृदयाचा औरंगाबाद ते मुंबई आणि फोर्टीस रुग्णालय असा 323 किलोमीटरचा प्रवास 94 मिनिटांत  झाला. फोर्टीस रुग्णालयात उपचार घेणार्‍या जालना येथील मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी हे ह्रदय आणण्यात आले. तिच्यावर आता यशस्वी शस्रक्रिया पार पडली असून सध्या तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

एका रस्तेअपघातात आपला जीव गमावलेल्या 13 वर्षीय मुलाचे हृदय जिवंत होते. हे हृदय औरंगाबादच्या एमजीएम रूग्णालयात  ठेवण्यात आले होते. हॉस्पिटलमधून औरंगाबाद विमानतळाकडे हृदय 1.50 मिनिटांनी निघाले. साधारण 1.54 मिनिटांनी हे हृदय विमानतळावर पोहोचले. केवळ चार मिनिटात 4.8 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ग्रीन कॉरिडोअर बनविण्यात आला. त्यामुळेच इतक्या कमी वेळात हृदय विमानतळापर्यंत पोहोचू शकले, अशी माहिती हॉस्पिटलने दिली आहे.

चार्टर्ड विमानाने हृदय मुंबईला रवाना
दरम्यान, एका चार्टर्ड विमानाने 3 वाजून 5 मिनिटांनी हे हृदय मुंबई विमानतळावर पोहोचले. तिथून 18 किलोमीटर दूर असलेल्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये हे हृदय केवळ 19 मिनिटांत पोहोचविण्यात आले. त्यासाठीही ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला  फोर्टिनसे दिलेल्या अधिकृत प्रतिक्रियेत म्हटले आहे की, हृदय 3.24 मिनिटांनी औरंगाबादहून निघाल्यावर एक तास 34 मिनिटांत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हे अंतर सुमारे 323.5 किलोमीटर इतके होते.