Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज ठाकरेंच्या घरासमोर बसणार फेरीवाले

राज ठाकरेंच्या घरासमोर बसणार फेरीवाले

Published On: Jan 17 2018 2:01AM | Last Updated: Jan 17 2018 12:49AM

बुकमार्क करा
मुंबई  : प्रतिनिधी 

महापालिकेने फेरीवाल्यांना बसण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या एम. बी. राऊत मार्गावर तसेच मनसेच्या मुख्यालयासमोर जागा निश्चित केल्या आहेत. पालिकेने हे जाणूनबुजून केले असल्यास मनसे स्टाइलने याचा समाचार घेतला  जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

पालिकेने जाहीर केलेल्या फेरीवाला क्षेत्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राहात असलेल्या कृष्णकुंज येथील एम. बी. राऊत मार्गावर 10 फेरीवाला जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर मनसेचे मुख्यालय असलेल्या पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेर 100 फेरीवाले बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार शिवसेना भवनाच्या बाजूला असलेल्या न. चिं. केळकर मार्गावर 100, भवानी शंकर रोडवर 200, गोखले रोडवर 200 असे एकूण 500 तर भाजपचे कार्यालय असलेल्या दादर येथील फाळके रोडवर 310 फेरीवाले बसवले जाणार आहेत.